प्रबळगड हा किल्ला पनवेल - माथेरान भागात व एक दिवसात करता येण्या सारखा सोपा किल्ला आहे. कल्याण वरून पनवेल पुढे शेडुंग फाट्यावरून डावीकडे वळण घेत बेलवली मार्गे वर्दोली गावात जायचं व तिथून पुढे ठाकूर वाडीत पोहोचायचं. कल्याण वरून हि ट्रेक एका दिवसात करता येते. गाड्या ठाकूर वाडीत पार्क करायच्या, ठाकूर वाडीतून कलावंतीण दुर्ग ( डाव्या बाजूचा उंच सुळका ) व प्रबळ गड याचं दर्शन घ्यायचं आणि ट्रेक चालू करायची. एक तासाभराच्या पायपिटीनंतर आपण प्रबळगड वाडीत (माची प्रबळ ) पोहोचतो. गावातून बाहेर पडल्यावर उजव्या बाजूला बाहेर पडणारी वाट पकडायची आणि सरळ किल्ला गाठायचा. त्या आधी गावात गावकर्यांना जेवणाची सोय / व्यवस्था करायला सागायची, जेणेकरून पूर्ण किल्ला भटकून आल्यावर जेवणावर ताव मारता येइल. या आधी आम्ही एकत्र ४/५ ट्रेक केल्या असल्यामुळे आणि कल्याणलाच सगळे राहत असल्याने नेहमीचा ग्रुप घेऊन ट्रेकला जायचं ठरलं. प्रामुख्याने सांगायचं तर डॉक्टर एकनाथ जगताप, सुरेश सुर्डे, राजेश तांबे, भूषण गायकवाड, प्रमोद वाघमारे, सलीम पिंजारी व मी स्वत ( संजय ) अशी फौज घेऊन आम्ही किल्ले प्रबळ गड सर करायचं ठरवलं आणि केला सुद्धा.
![]() |
| प्रबळगडावर पसरेले धुक |
![]() |
| समोर दूरवर दिसत असलेला कलावंतीण दुर्ग ( छोट्या टोपी सारखा दिसतोय तो ) |
![]() |
| डावीकडून राजेश, मी, सुरेश |
![]() |
| सलीम खेकडा पकडताना |
![]() |
| सलीम खेकडा पकडताना |
![]() |
| पावसळ्यात येणारी फुले |
![]() |
| प्रवेश द्वाराजवळ श्री गणेश व हनुमान मंदिर |
![]() |
| मुंग्याच वारूळ आणि भुंगा भूषण |
![]() |
| आलीम्बी ( मशरुम ) |
![]() |
| प्रबळ गडावरून कलावंतीण दुर्ग ... |
![]() |
| भिगे ओठ तेरे प्यासा दिल मेरा लगे अमृतसा मुझे तन तेरा … कभी मेरे साथ ....( खेकडा प्रेम ...) |






















No comments:
Post a Comment