मुंबईपासून एक दिवसात फिरून येण्यासारखा किल्ला. मच्छिंद्रगड आणि गोरखगड असे बाजू बाजूला असलेले दोन किल्ले. शिवाजी महाराजांच्या काळात गोरखगड हा किल्ला टेहळणी करण्यासाठी वापरला जात असे त्यात प्रामुख्याने नाणेघाट, जुन्नर आणि कल्याण व आजूबाजूचा परिसर असे.
सकाळी ७ च्या सुमारास कल्याण वरून निघून २ तासात आपण कल्याण - मुरबाड - म्हसा - देहरी अशा मार्गाने किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो. पुढे देहरी गावात जाऊन आपल्या नावाची नोंद करावी, जेणेकरून कोणतीही अडचण आल्यास गावातील लोकांना आपल्याला मदत करता येइल. गाडी पार्किंगची व्यवस्था गावात आहे.गावातून थोड मागे चालत यायचं ( डांबरी रस्ता ) आणि गावातील देवळाच्या मागच्या बाजूने ( पायऱ्या चढून गेल्यावर उजवी बाजू ) चालायला सुरवात करावी. ती पायवाट थेट आपल्याला १ तासाभारात कालभैरव मंदिरात घेऊन जाते आणि इथून खरी चढण चालू होते.
तसं पाहायला गेल तर हि ट्रेक ३ टप्प्यात विभागली जाऊ शकते १) देहरी ते कालभैरव मंदिर किवा आईदेवी मंदिर २) कालभैरव मंदिर ते गुहा ३) गुहा ते गोरखनाथ मंदिर. दुसरा व तिसरा टप्पा अतिशय काळजी पूर्वक चढावा लागतो.
![]() |
| मच्छिंद्रगड आणि गोरखगड ( उजव्या हाताला ) |
![]() |
| गोरखनाथ सगळ्यात वरचा टप्पा |
![]() |
| कपारी - वर चढताना मदत घेण्यासाठी दगडात कोरलेली |
![]() |
| कपारी - वर चढताना मदत घेण्यासाठी दगडात कोरलेली |
![]() |
| पाण्याची टाकी |


























No comments:
Post a Comment