Monday, 30 September 2013

नाणेघाट

नाणेघाट

पूर्वीच्या काळी हा रस्ता जुन्नर जवळून कल्याण मध्ये लवकर पोहोचण्यासाठी वापरला जायचा.   या रस्त्यामुळे घाटावरील लोकांना खाली कोकणात येण सोप झाल आणि प्रवासाचा वेळ देखील वाचायचा त्यामुळे दळण  वळण सोयीस्कर होऊ लागल होत.  नाणेघाट नावामागे काय उद्देश असावा, अस विचार करण्या सारखं काहीच नाही अगदी सोपा अर्थ आहे आताचे टोलनाके.   ज्यांना कुणाला घाटावरून कोकणात ( जास्तकरून कल्याणात) व कोकणातून घाटावर जाऊन  व्यवसाय करायचा असेल आणि ज्यांना हा रस्ता काहींना काही कारणासाठी वापरावयाचा असेल त्यांनी तेवाच्या राजे लोकांना या जागेतून जाण्यासाठी  ( चांदीची ) नाणी  द्यायची.  नाणी जमा करण्यासाठी खूप मोठे दगडी रांजण तयार केलेलं आहेत आणि आजही ते सुस्थितीत आहेत.  नाणेघाटात छानस गणपती मंदिर आहे, राहायला गुहा सुद्धा आहेत.  बरेच ट्रेकर्स मित्र रात्रीचे राहायला येतात.
नाणेघाटाच्या जवळपास जीवधन, चावंड, हडसर, शिवनेरी, लेण्याद्री व ओझर ( अष्टविनायक गणपती ) अशी बरीच प्रसिद्ध ठिकाणे पाहण्यासाठी आहेत.


नाणेघाट ला जाणारा गुंफा मार्ग दर्शविणारा प्रवेशद्वार 




नाणेघाट ला जाणारा गुंफा मार्ग दर्शविणारा प्रवेशद्वार 




पायथ्यापासून दिसणारा नानाचा अंगठा 



दगडी रांजण - यामध्ये चांदीची नाणी किंवा तेव्हा वापरात असणारी नाणी ठेवत असत. 




दगडी रांजण - यामध्ये चांदीची नाणी किंवा तेव्हा वापरात असणारी नाणी ठेवत असत. 




नाणेघाट माथा 




शर्वरी आणि मी … 




शर्वरी आणि मी … 




खेकडा 




श्री गणपती बाप्पा गुहा मंदिर - नाणेघाट माथा 




नाणेघाट माथा 

No comments:

Post a Comment