Monday, 1 December 2014

गोरखगड ... एक लयभारी ट्रेक


मुंबईपासून एक दिवसात फिरून येण्यासारखा किल्ला.   मच्छिंद्रगड आणि गोरखगड असे बाजू बाजूला असलेले दोन किल्ले. शिवाजी महाराजांच्या काळात  गोरखगड हा किल्ला टेहळणी करण्यासाठी वापरला जात असे त्यात प्रामुख्याने नाणेघाट, जुन्नर आणि कल्याण व आजूबाजूचा परिसर असे. 
सकाळी ७ च्या सुमारास कल्याण वरून निघून २ तासात आपण  कल्याण - मुरबाड - म्हसा -  देहरी अशा मार्गाने किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो. पुढे देहरी गावात जाऊन आपल्या नावाची नोंद करावी, जेणेकरून कोणतीही अडचण आल्यास गावातील लोकांना आपल्याला मदत करता येइल. गाडी पार्किंगची व्यवस्था गावात आहे.गावातून थोड मागे चालत यायचं ( डांबरी रस्ता ) आणि गावातील देवळाच्या मागच्या बाजूने ( पायऱ्या चढून गेल्यावर उजवी बाजू ) चालायला सुरवात करावी.  ती पायवाट थेट आपल्याला १ तासाभारात कालभैरव मंदिरात घेऊन जाते आणि इथून खरी चढण चालू होते. 
तसं पाहायला गेल तर हि ट्रेक ३ टप्प्यात विभागली जाऊ शकते १) देहरी ते कालभैरव मंदिर किवा आईदेवी मंदिर २) कालभैरव मंदिर ते गुहा  ३) गुहा ते गोरखनाथ मंदिर.   दुसरा व तिसरा टप्पा अतिशय काळजी पूर्वक  चढावा लागतो. 




मच्छिंद्रगड आणि  गोरखगड ( उजव्या हाताला )


















गोरखनाथ सगळ्यात वरचा टप्पा

कपारी - वर चढताना मदत घेण्यासाठी दगडात कोरलेली


कपारी - वर चढताना मदत घेण्यासाठी दगडात कोरलेली



पाण्याची टाकी


Sunday, 3 August 2014

प्रबळगड ( मुरंजन किल्ला )


प्रबळगड हा किल्ला पनवेल - माथेरान भागात व एक दिवसात करता येण्या सारखा सोपा  किल्ला आहे.  कल्याण वरून पनवेल पुढे शेडुंग फाट्यावरून डावीकडे वळण घेत बेलवली मार्गे वर्दोली गावात जायचं व तिथून पुढे  ठाकूर वाडीत  पोहोचायचं.  कल्याण वरून हि ट्रेक एका दिवसात करता येते. गाड्या  ठाकूर वाडीत पार्क करायच्या, ठाकूर वाडीतून कलावंतीण दुर्ग ( डाव्या बाजूचा उंच सुळका ) व प्रबळ गड याचं दर्शन घ्यायचं आणि ट्रेक चालू करायची.  एक तासाभराच्या पायपिटीनंतर आपण प्रबळगड वाडीत  (माची प्रबळ ) पोहोचतो.  गावातून बाहेर पडल्यावर उजव्या बाजूला बाहेर पडणारी वाट पकडायची आणि सरळ किल्ला गाठायचा. त्या आधी गावात गावकर्यांना जेवणाची सोय / व्यवस्था करायला सागायची,  जेणेकरून  पूर्ण किल्ला भटकून आल्यावर जेवणावर ताव मारता येइल. या आधी  आम्ही एकत्र ४/५ ट्रेक केल्या असल्यामुळे आणि कल्याणलाच सगळे राहत असल्याने नेहमीचा ग्रुप घेऊन ट्रेकला जायचं ठरलं.  प्रामुख्याने सांगायचं तर डॉक्टर एकनाथ जगताप, सुरेश सुर्डे, राजेश तांबे, भूषण गायकवाड, प्रमोद वाघमारे, सलीम पिंजारी  व मी स्वत ( संजय ) अशी फौज घेऊन आम्ही किल्ले प्रबळ गड सर करायचं ठरवलं आणि केला सुद्धा.




प्रबळगडावर पसरेले धुक

समोर दूरवर दिसत असलेला कलावंतीण दुर्ग ( छोट्या टोपी सारखा दिसतोय तो )

डावीकडून राजेश, मी, सुरेश


सलीम खेकडा पकडताना

सलीम खेकडा पकडताना

पावसळ्यात येणारी फुले

प्रवेश द्वाराजवळ श्री गणेश व हनुमान मंदिर



मुंग्याच वारूळ आणि भुंगा भूषण



आलीम्बी ( मशरुम )

प्रबळ गडावरून कलावंतीण दुर्ग ...







भिगे ओठ तेरे प्यासा दिल मेरा लगे अमृतसा मुझे तन तेरा … कभी मेरे साथ ....( खेकडा प्रेम ...)