Sunday, 23 September 2012

अहमदनगर - भिंगार / चाँद बीबी महल / अहमदनगर फोर्ट

जवळ  जवळ  ३/४ वेळा ठरवून रद्द केलेला आमचा नगरचा प्रवास, शेवटी ठरल काही झाल तरी यावेळेस रद्द करायचा नाही आणि तो दिवस उजाडला.  चक्क शुक्रवार/शनिवार/रविवार ( ३  दिवस  ) आणि ३ मित्र .  शशांक ने घेतलेली नविन चारचाकी न्यानोगाड़ी आणि तिचा प्रवास. मग विचारांच्या कान्या कोपऱ्यातून एक एक ठिकाण यायला लागल रांजणखळगी, चांद बीबी का महल, अहमदनगर किल्ला, भिंगार ( औरंगजेबची समाधी ) आणि बरीच ठिकाणे.    एक नक्की ठरवलं होत कि परतीचा प्रवास हा  पुण्यातून करायचा, परत तीच पर्वती, तोच शनिवार वाडा, तीच कात्रजची बाग आणि तेच सर्पालय, सारसबाग, दगडूशेठ हलवाई गणपती, लाल महाल  आणि बरच काहि.   आले गाव ( ज्ञानेश्वर महाराजांनी वेद ज्या रेड्याच्या तोंडून बोलवून घेतले त्या रेड्याची समाधी ). आता तिथे फार मोठ मंदिर आहे. आणि जवळच असलेला एक निसर्गनिर्मित पूल.  

मळगंगा माता मंदिर 


रवींद्र - मळगंगा माता प्रवेशद्वार 




वेद प्रणीत रेडा समाधी मंदिर, श्री क्षेत्र आले  

वेद प्रणीत रेडा समाधी मंदिर, श्री क्षेत्र आले  - प्रवेशद्वार 


निसर्गनिर्मित पूल


प्रवेशद्वार - भिंगार  औरंगजेब यांची समाधी ठिकाण 



डावीकडे मी आणि उजवीकडे शशांक - औरंगजेबाच्या समाधी जवळ 


चांद बीबी का महाल 

चांद बीबी का महाल 



शशांक - महालातल्या एका समाधी जवळ 

शशांक, रवि आणि मी 

काहीतरी आहे तिथे 

वरच्या मजल्यावर जायला असणारी वाट 
शोधा मग सापडेल - नवीन न्यानो 


अहमदनगर किल्ला 

रवि - किल्ल्याच्या बाहेर 







किल्ल्याचा प्रवेशद्वार 

तटबंदी 

Sunday, 26 August 2012

सज्जनगड

सज्जनगड म्हणजे  चांगल्या लोकांचा किल्ला.  चारी बाजूने मन वेधून घेणारा, लगतच छानस धरण आणि प्रसन्न वातावरण, गार गार  वारयाची झुळूक आणि पावसात धुक्यात हरवणारा किल्ला सौंदर्यात भर टाकावी असा जवळच असलेला ठोसेघर धबधबा आणि कासच पठार.  किल्ल्यावर पाहण्यासाठी बरच काही आहे पण आवड असेल तर. संत रामदास महाराजांची समाधी याच किल्ल्यावर आहे.  किल्ला सकाळी सुर्योदय पासून ते सूर्यास्तापर्यंत सगळ्यांसाठी उघडतात, मात्र नंतर परवानगी मिळत नाही




स्वामी समर्थ मंदिर 





मंदिराचा परिसर 




समर्थ महाप्रसादगृह 




डावीकडून शशांक, संजय (मी) आणि रवींद्र 




एक महा दरवाजा 




छत्रपती  शिवाजी महाराज प्रवेशद्वार 




समर्थ प्रवेशद्वार 




प्रवेशद्वारातील आतील बाजू 




किल्ल्याची तटबंदी 



सज्जन गडाच्या पायथ्याशी असलेल गाव. धरणाच्या बाजूने. 





हेच ते उर्र्मोडी  धरण 




 हनी बी 








भारद्वाज 




पावसात येणार एक फुल 












पावसात येणार एक फुल 



Wednesday, 18 July 2012

Raigad in Monsoon

आताचा रायगड पण तेव्हाचा "रायरी".  छत्रपती शिवाजी महाराज यांनी १६५६ साली चंद्रराव मोरे यांच्याकडून जिंकून घेऊन पुन्हा हिरोजी इंदुलकर यांनी बांधलेला.  सह्याद्रीच्या कुशीत २७०० फूट उंच असलेला आणि अफाट निसर्गाची संपती असलेला, वर्षभरात कधीही भेट द्यावी अस वातावरण असलेला किल्ला.  महाराज्यांनी राज्याभिषेकासाठी  निवडून सर्व किल्ल्यांमध्ये मानाच स्थान लाभलेला किल्ला.   महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यात महाड जवळ असलेला. किल्ल्यावर पाहण्यासारख बरच काही आहे म्हणायचं असेल तर महादरवाजा, नगारखाना, होळीचा माल, मार्केट, जगदीश्वर मंदिर, राजांची समाधी, गंगा सागर तलाव, लाल तलाव, राणी महाल, टकमक टोक, अंधार खाना आणि अजून बरेच काही.  किल्ल्यावर जाण्यासाठी १४०० ते १५०० पायऱ्या लागतात. ज्याना किल्ला चढायला जमणार नाही अशा लोकांसाठी रोपवेची सुविधा आहे आणि ती ही फ़क्त १०० रुपयांत. 



रायगड..पायथा ...   


धुक्यात हरवलेला टकमक टोक .. पायथ्यापासून 


एक दृश्य.. देशमुख हॉटेल जवळ  


सभेतील छत्रपती शिवाजी महाराजांचं बसण्याच  सिंहासन  

तोफा... 


टकमक टोकावरून ... महादरवाजा 

किल्ल्याची समोरची बाजू 

सुरेश.. महादरवाजा जवळ ..
महादरवाजा 


पाचाड गावातील .. राजमाता जिजाऊ यांची समाधी 

पाचाड गावातील .. राजमाता जिजाऊ यांची समाधी 




छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी 
राजांच्या समाधी समोर असलेली ... वाघ्याची समाधी 




शिरकाई देवीच्या मंदिर परिसरात असलेल्या मुर्त्या 

आई शिरकाई देवी 

नगारखाना .. प्रवेशद्वार 

जगदीश्वर मंदिर 

नंदी.. जगदीश्वर मंदिर 



होळीच्या मालावरील .. महाराजांची मूर्ती 

होळीच्या मालावर -    सुरेश आणि राजेश 
एक दृश्य.. देशमुख हॉटेल जवळ  

टकमक टोका जवळील एक दरी.. एक सुंदर फ्रेम 


रायगडावर डावीकडून राजेश, सुरेश आणि शकील 

रायगडावर डावीकडून शकील, मी आणि राजेश 

राणी महाल ( दरवाजा ) - शकील आणि दरवाज्यात उभा असलेला राजेश