कोथळीगड किंवा पेठचा किल्ला
सकाळी सातच्या वेळेस ( कल्याण ) गाडी घेऊन निघालो आणि शशांकला थेट शिळफाटा येथे भेटलो. पुढे सरळ पनवेल गाठला आणि पुण्याला जाणारा रस्ता पकडला, तिथून पुढे चौक फाट्यावरून कर्जतला जाणारा रस्ता पकडला. कर्जत मुरबाड रोड वर ३० ते ३५ किलो मिटर असलेला सुंदर किल्ला. याच रस्त्यावर कडाव गावचा प्रसिद्ध बाळगणेश मंदिर आहे, तिथे दर्शन घेऊन सरळ पुढे जायचं आणि किल्ल्याच्या पायथ्याशी आंबिवली गावात पोहोचायचं. इथून खरी ट्रेक सुरु होते, अडीच तीन तासाच्या
पायपिटी नंतर आपण पोहोचतो पेठ वाडीत / कोथळीगड वाडीत. इथून पुढचा रस्ता थोडा चढण असलेला आहे, पूर्ण किल्ला फिरून खाली परतायला दोन तास लागतील इतका छोटा किल्ला आहे.
किल्ल्यावरून भीमाशंकर रेंज, पदरगड दिसतो. गावात आदीच जेवणाची व्यवस्था करायला सांगावी जेणेकरून फिरून आल्यावर भूक लागली कि जेवणावर ताव मारता येईल. मग पोटभर खायचं आणि निघायचं घरला.
 |
| कोथळी गडाच्या वाटेवर दिसणार एक सुंदर दृश्य |
 |
| कोथळी गडाच्या वाटेवर दिसणार एक सुंदर दृश्य |
 |
| माझी बाईक - नेहमीची सोबतीन, कोणी सोबत असो नसो हि मात्र असते… |
 |
| मागे दिमाखात उभा असलेला कोथळी गड |
 |
| शशांक - किल्ल्याची उंची मोजताना हा हा हा … |
 |
| रानकेळी - मला काढून देताना एक गावकरी |
 |
| कोथळी गडाचा पहिला दरवाजा |
 |
| कोथळी गडावरील मंदिर |
 |
| किल्ल्यावरील गुहा |
 |
| गुहेतील देवीची मूर्ती - आमच्या आधी आलेल्या ट्रेकर मित्रांनी तिथे दिवा लावला होता. |
 |
| गुहेतील खांबावर असलेली डीझाईन… |
 |
| गुहेतील खांबावर असलेली डीझाईन… |
 |
| गुहेतील खांबावर असलेली डीझाईन… |
 |
| छोटस पिण्याच्या पाण्याचा तळ… |
 |
| किल्ल्याच्या बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी आतून कोरलेला पायऱ्यांचा रस्ता |
 |
| किल्ल्याच्या बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी आतून कोरलेला पायऱ्यांचा रस्ता |
 |
| किल्ल्याच्या सगळ्यात उंच भागात असलेला तळ |
 |
| किल्ल्यावरून दिसणार मनोहर दृश्य |
 |
| किल्ल्याच्या एका दरवाजावर असलेली डीझाईन |
 |
| किल्ल्याच्या एका दरवाजावर असलेली डीझाईन |
 |
| मी आणि शशांक - किल्ला उतरताना |
 |
| का ? व कशासाठी ? |
 |
| गुहेतील डीझाईन… |
 |
| एक छोटी खोली - किल्ल्याच्या सगळ्यात उंच भागावर जाताना मधेच लागते |
 |
| तोफ |
 |
| परतीचा प्रवास |
 |
| खूप भूक लागली होती… गावातून भाकरी आणि भाजी बांधून घेतली आणि माळरानावर खात बसलो होतो… नंतर काय क्षणभर विश्रांती… आणि परतीचा प्रवास |
 |
| मागे काहीच नहि… फक्त आठवणी … परत येन होईल न होईल कोण जाने …. तरीसुद्धा मागे वळून पाहताना मी … आशा म्हणतात ते यालाच …. . |