Sunday, 25 July 2010

Shivneri Fort

शिवनेरी, कल्याण शहरापासून १५० किलो मीटर अंतरावर असलेला किल्ला. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे जन्म ठिकाण. मुंबई कडून जाताना माळशेज घाट आणि पुढे लागणारा सितेवाडीचा घाट ओलांडला कि आपण पोहोचतो ते थेट शिवनेरीच्या पायथ्याशी. पावसाळ्यात गेलात तर नक्कीच मनाला आणि डोळ्यांना भुरळ घालतील अशी निसर्गाची वेग वेगळी रूपे / दृश्य पाहायला मिळतात. कुठे तरी छान आकाशात लक्ष न्या मग मस्त पैकी इंद्रधनुष्य आपली वाटच बघत असतो.  धुक्यात हरवलेला माळशेज आदीच पाहून मन तृप्त  झालेलं असते आणि आता शिवनेरी वरील कडेलोट तुमची वाट बघत असतो. गंगा,  जमुना पाण्याची टाकी आणि शिवतीर्थ ( जन्म ठिकाण ), पाळणा पाहायला अजिबात विसरू नका,  हा पाळणा पाहून शिवबा साठी अंगाई गाणारी जिजाऊ आठवाच. मग मनाशी गाठ बांधून टाका, हा पावसाला शिवनेरी वरच.  पुढे थोडा वेळ असेल तर लेण्याद्री ( अष्टविनायक ) गणपती पाहून घ्या, अगदी हाकेच्या अंतरावर आहे ( ९ किमी). आजू बाजूला पाहण्यासारख बरच काही आहे. भीमा शंकर, ओझर, लेण्याद्री, माळशेज, आलेफाट्याजवळील ज्ञानेश्वरांचा  वेद  बोलणारा रेडा  आणि नव्याने बांधलेलं धरण, हरिश्चंद्रगड बघून या.  

लेण्याद्रीच्या  पायथ्यापासून   दिसणारा शिवनेरी  

गणेश दरवाजा 


अजून एक दरवाजा 

शिवाई देवी मंदिर दरवाजा, आणि शकील 


मेणा दरवाजा, इथपर्यंत राज घराण्यातल्या स्त्रियांनी चालत यायचं आणि पालखीत ( मेणा ) बसायचं.


शेवटच टोक म्हणजे कडेलोट. 

शिवाई मंदिर 

शिवतीर्थ ( जन्म स्थळ )


पाळणाघर 

पाळणाघर 

शिवतीर्थ आणि रिमझिम पावसाची मजा घेत बसलेला शकील. 


शिवनेरीचा नकाशा 

शिवनेरी प्रवेशद्वार आणि द्वारपाल शकील 

डावीकडून शकील आणि मी 

शिवनेरीच्या एका कड्यात मधमाशीचा पोळा 

कुलूप दरवाजा आणि झोळी घेऊन उभा असलेला द्वारपाल 

फक्त शिवतीर्थ