कुल्लू आणि मनालीच्या कुशीत असलेल हे सुंदर ठिकाण. सौरकुंड, १२९०० फूट उंच असलेला हा पट्टा म्हणजे स्वर्गात जाणाऱ्या पायऱ्याच असाव्यात असा भास करणारी पर्वत रांगा. बबेली नावच एक छोटस ठिकाण, इथून होणारी खरी सुरवात आणि जवळच वाहत जाणारी ब्यास नदी आणि आजूबाजूला असणारी विहंगम दृश्य. मन वेडावून टाकणारी पर्वत रांगा आणि इथे असलेल्या विविध बागा ( सफरचंद, प्लम अजून बरीच काही) , फुल झाडे आणि फुल पाखरे. सगळ्यात महत्वाच म्हणजे इथे पडणारा बर्फाचा पाऊस.. आपल्याला फक्त गारांचा पाऊस माहित असतो.. इथे आल कि कळत त्याही पलीकडे अजून बरच काही दडलय या निसर्गात. धमाल मजा, खरच कधी जमलच तर नक्कीच जाऊन या हिमालयाच्या कुशीत आणि बघा आयुष्याची खरी मजा काय आहे ती.
 |
| हिम्माछादित डोंगर रांगा
|
 |
| एक घरट आमचं, यातच राहिलो होतो तेवा.
|
 |
| काहीच बोलणार नाही, शब्दच अपुरे पडतील असा क्षण.
|
 |
| एक घर आणि गोठा
|
 |
| कुलूप
|
 |
| काय विनतेय बर...
|
 |
| बर्फापासून घराच संरक्षण
|
 |
| मी .. मायलीच्या कुशीत... उंची फक्त १०५००.
|
 |
| मायली जवळ लावलेले तंबू ...
|
 |
| असावा सुंदर चॉकलेटचा बंगला
|
 |
| मी अजिबात जंगली माणूस नाही आहे.
|
 |
| काहीतरी शिकतोय मी.
|
 |
| होरा थात्च... उंची ९००० फूट.
|
 |
| इथे पाऊस पडताना ... सूर्य सुद्धा रात्रीचा चंद्र वाटतो.
|
 |
| डावीकडून मिहीर, मी, मित्रा सर आणि डॉक्टर एकनाथ जगताप
|
 |
| झाड वाढलय...पण मूळ दिसतच नाहीत
|
 |
| नयनरम्य देखावा
|
 |
| सौर कुंडी - १२९०० फूट उंच. हीच तर उंची होती ... जी गाठली आम्ही.
|
 |
| सौर कुंडी - १२९०० फूट उंच. हीच तर उंची होती ... जी गाठली आम्ही.
|
 |
| १२५०० फूट उंचावर असलेला बर्फाचा माळरान.
|
 |
| एक दैविक ठिकाण.. इथे जत्रा होते.. पायथ्याशी असलेल्या गावातून लोक येतात आणि जत्रा भरते.
|
 |
| अजून थोडस उंच जाऊया
|
 |
| एक विहंगम दृश्य
|
 |
| या फोटोतला उजवीकडचा रस्ता बघा.. नागमोडी वळण याला म्हणतात.
|
 |
| जंगली फूल..इथे माणूस मागे पडतो आणि त्याची जागा कॅमेरा घेतो.
|
 |
| मी आणि रमेश
|
 |
| दिल ही छोटासा.. छोटीसी आशा..
|
 |
| मित्रा सर, दौरा थात्च .. ११३०० फूट उंच.
|
 |
| एक छानस घर
|
 |
| आमच्या तंबूवर काढलेली कलाकृती..कुणी काढली मला माहित नाही.
|